Monday 21 July 2014

माझे मी-पण


माझे मी-पण

तू डोंगराची माया
तू आभाळाची छाया
तू हिमालयाची काया
तू देवदूतासम साया

मज ठेच लागता पायी
अश्रू तरळे तुज नयनी
मज बोल लागता कठोर
तू कृधसी मनोमनी

तुझे नदिसम वाहणे
माझे दंग होवुनी पहाणे
ओढीसह सागरभेटी
तुझे उराउरी भेटणे

लागता चाहूल संकटाची
तुझॆ ढाल बनोनी जाणे
परतावूनी सहजी रिपुंस
तुझे सहज शांत रहाणे

अद्न्यात अशा नात्याचे
मई नाव शोधित बसणे
तू सहज हसनी त्यास
माझे 'मी-पण' म्हणणे

-अमित श्री  . खरे

Monday 9 June 2014

पहिला पाऊस

पहिला पाऊस 

पहिल्या पावसाची 
पहिली आठवण 
तप्त मातीच्या 
गंधाची साठवण 

पहिल्या  धारांत 
पहिले भिजणे 
मळभ मनीचे 
अलगद सरणे 

पहिल्या थेम्बाचा 
पहिला नाद 
मृदुल स्वरांनी 
द्यावी साद 

पहिल्या तळ्यात 
पहिली नाव 
झऱ्या झऱ्यांतून 
सफ़ेद गाव 

पहिल्या नभांचे 
फिरुन जाणे 
चातक मनीचे 
वाट पहाणे 

पहिला पाऊस 
सांगुनी जाई 
भाजल्या भुई 
मिलन घाई 


-अमित श्री  . खरे 

Friday 7 March 2014

माणूस शोधतो मी

माणूस शोधतो मी

 सपाट जमीन
उंच इमारत,
रस्त्याचे जाले 
वारा तुरलक.
घराच्या गच्चीत 
गुलाबाचे रोप
स्पर्टेक्स च्या फारशीला
वासाचा सोप.
खीडक्यांच्या  काचांना 
लाकदान्च्या चौकटी
जंगलातल्या प्राण्यांचे
जीवनच विस्कटी.
प्रत्येक डोंगरात
निघते खाण
समुद्रात नेवून 
टाकतात घाण.
होतात स्फोट
रोज इथे खून
हेच बघतो
रोज टिव्ही मधून.
रोज नवी सत्ता
रोज नवा नेता
थाम्बताही नाही
ह्यांच्या तोंडाचा भाता.
माणूसकी ही इथे
किलोवर मिळते 
किलोभर विकते
बाकी गोड़ावूनमध्ये पड़ते.
रोज रोज हे 
दगड़ होवून बघतो मी
रोज रोज नव्याने 
माणूस शोधतो मी. 

-अमित श्री. खरे 

Wednesday 5 March 2014

जत्रेच्या दिवशी

जत्रेच्या दिवशी

अरे बाप रे केवढी ही जत्रा,
वीतेवरून उतरताना विठू म्हणाला.
प्रचंड मोठी रांग,
हज़ारो कलपाम्च्या झुंडी,
प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा,
तरी सगलेच मारता आहेत मुसंडी!
चन्द्री तर दिसेनाशीच झाली,
आणि रुक्मिनीही रुसून गेली,
आज अठरा युग झाली,
तरी जात्रा संपत नाही,
येतात, राहतात, खातात, पीतात,
पण साफ कुणीच होत नाहीत.
मी मात्र असा वीटेवर थकलो,
पण माणूस कसा थकत नाही,
अव्याहत मागत राहतो फ़क्त,
कष्ट मात्र करत नाही.
काय सांगू, कसं सांगू,
काही-काही कळत नाही,
शेवाटीही सगळ इथेच साचत,
काहीच टाकता येत नाही!
म्हणालो , "बाबांनो येवू नका,
आषाढी कार्तिकी करू नका,
ते करून काहीच होत नाही, आणि केला नाहीत,
तर मी काही पलून जात नाही!"
नंतर चूक लक्षात आल्यावर,
मीच म्हणालो येत जा,
नाहीतर आषाढी कार्तीकीसोदूनही,
कधीतरी दर्शन देत जा!
दोन महीने सोडले,
तर कुणी कुणी येत नाही,
मागण्या पूर्ण झाल्या,
की ओळख सुधा देत नाही.
परत एकदा वीटेवर चढून,
आणि कमरेवर हात ठेवून,
जेव्हा तो पहातो,
तेव्हा परत सज्जा होतो,
अठरा युगांचा 
कंटाला झेलायला.

- अमित श्री. खरे 

प्रतिबिम्ब

प्रतिबिम्ब 

पुरे झाले तुझे 
असे शांत बसणे 
अपमानही तू 
सहज पोटी घेतो 
पुरे झाले आता 
तुझे फ़क्त हसणे 
दुःख अपार कधीचे 
सहजच लपवतो 

बोल जरासा 
अबोला सोडून 
सागर मनीचा 
वाहून जावो 
किंवा लाभो थोड़ा 
ओलावा मायेचा 
दुःख तयाने 
उडून जावो 

तू लपवीत असशील 
यातना मनी 
तुज नयनी त्या 
सहज वाचतो 
तू सहज हसता 
नकळत गाली 
आनंदे त्या मी 
स्वैर नाचतो 

बघू न शकतो 
नयनी आसू 
ते माझ्यावर 
ओझे होते 
बघण्या रेषा 
हास्याची गाली 
मनही पागल 
होवून जाते 

म्हणून सांगतो 
सांग मजला 
दुःख  तुला जे 
नकळत छळते
तू हसत असता 
जना मनातून 
यातना तुझी 
सहजच कळते 

ही नाळ असेल 
मायेची बहुधा 
तुजला मजला 
जोडून जाते 
अथवा असेल 
मनी जिव्हाळा 
तुजला मजला 
प्रतिबिम्ब करते 

-अमित श्री  . खरे  

Saturday 15 February 2014

तुजपाशी

तुजपाशी 

तुज तुजपाशी असो सारे 
तू माझ्यापाशी रहा 
तू असताना कसली चिंता 
तू जग माझ्यातून पहा 

तुझे नि माझे नाते निराळे 
हे कधी कुणा न समजे 
मजला पड़ती प्रश्न हजारो 
तुज त्याचेही उत्तर उमजे 

माझे मीपण कधी दडून बसते 
बेचैन तुझ्या जीवास लागे 
त्या शोधाया तत्परतेने 
तुझे मन दसदिशात धावे 

शोधून आणि शीताफिने 
त्या प्रेमाने मग कुरवालते 
चुक तयाचि घालून पोटी 
पप्रेमानेच समजावते 

तू असताना म्हणून मी ही 
निर्धास्तपणे स्वैर धावतो 
चुकत असलो वाट कधी तर 
नजरेनेच मार्गी येतो 

Thursday 13 February 2014

शून्य दिवस 

शून्य दिवस 

आज घरा घरावर दिसतील 
तिरंगे फडकलेले 
आज चौका चौकात ऐकू येतील 
देशाभाक्तिची गीते 
आज सगलेच गातील 
ओरडून ओरडून राष्ट्रगीते 
आज सगलेच म्हणतील 
'तूच देवी भारतमाते'
आज सगलेच सकाली लवकर उठतील 
ध्वजारोहण करायला 
दिल्ली पासून गल्ली पर्यन्त 
अशास्वत अवास्तव भाषण ठोकायला 
आज सगाल्यान्च्याच मणी जागा होईल 
ज्वलंत राष्ट्राभिमान 
अन प्रत्येकाजन तैयार होईल 
सीमारेषेवर जायला आज . 
उद्या लागेल ह्यांना 
हालवून जागं करायला 
अन मागे लागावं लागेल 
आवरून ह्यांना कामावर पाठवायला . 
उद्या सकाळी दिसतील 
रस्त्यावर पडलेले असंख्य तिरंगे 
उद्या सकाळी दिसतील 
गरीब, भिकारी, उघडे नंगे . 
उद्या संध्याकाळी विचारा ह्यांना 
ह्यांचे मनोरे रचलेले असतील 
रात्री भेटलात समजा अवचित 
तेच मनोरे झुलताना दिसतील . 
आज ह्यांना आनंद आहे उत्साह आहे 
निमित्त त्याच सुट्टी आहे ,
आज समजा सुट्टी नसती तर 
दिवसाच महत्त्व शून्य आहे . 

-अमित श्री . खरे